फडणवीसांचा सागर बांगल्यावर वॉशिंग मशिनचे काम चालते – नाना पटोले



ब्युरो टीम
: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बांगला हे वॉशिंग मशिनसारखे काम करत आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारवर निशाणा साधला आहे.

     भाजपला संपूर्ण जग जिंकायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यात ईडीचे सरकार आहे आणि ईडीचा धाक दाखवून भाजपने सरकार स्थापन केले आहे. केंद्र सरकारला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

      रश्मी शुक्ला प्रकरणावर बोलताना नाना पटेल म्हणाले की, हे प्रकरण आधीच कोर्टात आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलायचे नाही. मंगळवारी वादग्रस्त IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने