ब्युरो टीम: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी जवाहिरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन मारल्यानंतर जवाहिरीने 2011 मध्ये दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतली होती.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हा ड्रोन हल्ला अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या विशेष पथकाने केला. ऑगस्ट 2011 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून जवाहिरी काबूलमध्ये राहत होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या या कारवाईवर तालिबान संतापले असून त्यांनी हे दोहा कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
बायडेन म्हणाले - शोधून मारले, ऑपरेशन यशस्वी
अल-जवाहिरीच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही जवाहिरी याला शोधून मारले. अमेरिका आणि तिथल्या लोकांना निर्माण होणारा कोणताही धोका आम्ही सोडणार नाही. आम्ही अफगाणिस्तानातील दहशतवादावर हल्ला सुरूच ठेवणार आहोत.
अल जवाहिरीवर 9/11 हल्ल्याचा आरोप
11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी 4 व्यावसायिक विमानांचे अपहरण करून अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरला धडक दिली होती. अमेरिकेत हा हल्ला 9/11 म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात 93 देशांतील 2 हजार 977 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात ओसामा बिन लादेन, अल जवाहिरी यांच्यासह अल कायदाच्या सर्व दहशतवाद्यांना अमेरिकन तपास संस्थेने आरोपी केले होते.
अमेरिकेच्या हल्ल्यात जवाहिरी दोनदा निसटला
जवाहिरीला मारण्याचा अमेरिकेने यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केला होता. 2001 मध्ये जवाहिरी अफगाणिस्तानातील तोरा बोरा येथे लपल्याची माहिती मिळाली होती. मात्र, हल्ला होण्यापूर्वीच जवाहिरी पळून गेला. मात्र, या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुले ठार झाली होती.
त्याचवेळी 2006 मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने जवाहिरीला मारण्यासाठी पुन्हा सापळा रचला. त्यावेळी तो पाकिस्तानातील दमडोला येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, क्षेपणास्त्र हल्ला होण्यापूर्वीच जवाहिरी तेथून निसटला होता.
अल जवाहिरीचा अखेरचा व्हिडिओ एप्रिलमध्ये रिलीज
अल जवाहिरीने या वर्षी एप्रिलमध्ये 9 मिनिटांचा व्हिडिओ जारी केला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड हे इस्लामविरोधी देश असल्याचे म्हटले होते. व्हिडिओमध्ये जवाहिरीने भारतातील हिजाबच्या वादावरही बेताल वक्तव्य केले होते.
सलग 11 वर्षापासून अल कायदाचा प्रमुख असलेल्या जवाहिरीबद्दल जाणून घ्या
अल जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता. अरबी आणि फ्रेंच भाषिक असलेला जवाहिरी हा पेशाने सर्जन होता. वयाच्या 14 व्या वर्षी तो मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला.
1978 मध्ये कैरो विद्यापीठातील तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी अजा नोवारीशी त्याने लग्न केले. कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नाने त्या काळातील उदारमतवादी कैरोचे लक्ष वेधून घेतले कारण या विवाहाने पुरुषांना स्त्रियांपासून वेगळे केले. छायाचित्रकार आणि संगीतकारांना दूर ठेवण्यात आले. हसणे आणि मस्करी करणे देखील निषिद्ध होते.
जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही लढाऊ संघटना होती. त्याची इच्छा इजिप्तमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्याची होती.
1981 मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेल्या आणि छळ करण्यात आलेल्या शेकडो लोकांमध्ये जवाहिरीचा समावेश होता. तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो देश सोडून सौदी अरेबियात आला.
सौदीत आल्यानंतर त्यांने एका औषध विभागात प्रॅक्टिस सुरू केली. सौदी अरेबियातच अल-जवाहिरीने अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनशी भेट घेतली होती.
बिन लादेन 1985 मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाचा प्रसार करण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता. येथूनच या दोन दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले.
2001 मध्ये, अल-जवाहिरीने EIJ चे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला.
अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला होता.
टिप्पणी पोस्ट करा