दहीहंडीच्या थरथराटात १४८ गोविंदा जखमी



ब्युरो टीम:   शुक्रवारी महाराष्ट्रभरात तब्बल दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. विशेष तह मुंबई ठाण्यात आयोजित केलेल्या लाखमोलाच्या दहीहंडी सोहोळ्यांमध्ये राज्यातील गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता.

   बी   कुठे सात, आठ तर कुठे नऊ थर लावत गोविंदा पथकांनी या सोहोळ्याला चारचांद लावले. मात्र एकीकडे हा उत्सव साजरा होत असताना दहीहंडीच्या थरथराटात मुंबई  ठाण्यातील  तब्बल १४८ गोविंदा जखमी झाले आहेत.

      मुंबई ठाण्यातील दहीहंडीत ज्या प्रकारे उत्साह दिसून आला तसेच काही ठिकाणी गोविंदांचे अपघातही झाले. गोविंदांची पंढरी समजल्याजाणाऱ्या ठाण्यात ३७ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील २३ गोविंदांवर उपचार सुरु असून यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. तर मुंबईत १११ गोविंदा जखमी झाले असून यातील ८८ जणांना उपाचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच अद्याप कोणीही मृत्युमुखी पडलेले नाही.

      दहीहंडी उत्सवा दरम्यान, गोविंदाला दुखापत झाल्यास जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार ज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना जखमी गोविदांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.

      राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील, असे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

--------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने