अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पाची मूर्ती आहे खास


 


        आज गणेश चतुर्थीचा आनंद सर्वत्र दिसतो आहे. गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला झाल्याने सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे. सर्वांच्याच घरी आज गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच अभिनेता स्वप्नील जोशी याच्याही घरी दरवषी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. स्वप्नीलच्या घराचा बाप्पा दीड दिवसच असतो. बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं की नेहमीच प्रसन्न वाटतं. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरची बाप्पाची गणेशाची मूर्ती खूप खास आहे. नेमकं काय वैशिट्य आहे या मूर्तीचं?

       गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया म्हणत स्वप्नील जोशीने त्याच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्याच्या घरी गणपतीची ही एकच मूर्ती दरवर्षी विराजमान होते. पर्यावरणाचा विचार करून स्वप्नील जोशीने ही गणपतीची मूर्ती विशेषत्वाने घडवून घेतली आहे. स्वप्नील जोशीच्या घरी असेलेली ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच विसर्जन केल्याने तलाव, नदी आणि समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे आणि म्हणूनच स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबीयांनी पंचधातूची गणेश मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला.

     गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना स्वप्नीलने पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतली आहे. घरच्या बाप्पाची पूजा करतानाचा एक व्हिडीओ सुद्धा  इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यात स्वप्नील जोशी त्याच्या कुटुंबासोबत गणपतीची प्रार्थाना करताना दिसत आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने