महिलांनी मेहनतीच्या जोरावर पद मिळवलं तर अधिक चांगलं; अमृता फडणवीसांचं भाष्य

 

ब्युरो टीम: मुंबई, 15 ऑगस्ट : भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही झालं आहे. मात्र सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात एकही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी यावरुन एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. याच मुद्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. महिलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मंत्रिपद मिळवलं पाहिजे असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

        मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टप्प्यात महिलांना स्थान मिळालं नाही. माझी महिला म्हणून इच्छा आहे की प्रत्येक क्षेत्रात महिलांना स्थान मिळालं पाहिजे. मात्र महिलांना काही गोष्टी 'डिमांड' करण्यापेक्षा 'कमांड' केल्या पाहिजेत. महिलांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते स्थान मिळवले पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. तसेच नवीन सरकाकने विकासासाठी डबल मेहनत घेतली पाहिजे. काही बाबतीत मागच्या काळात राज्य मागे राहिला होता तो आता वेगाने पुढे गेला पाहिजे.

       


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने