आज सांगता झालेल्या बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली. त्यामुळे भारताला या स्पर्धेत चौथे स्थान पटकावण्यात यश आले. भारताने यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असुन, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने टेबल टेनिसमध्ये अंचता शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. बॅडिमटनमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली. अखेरच्या दिवशी पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने बाजी मारली. पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सुवर्णकामगिरी केली. यंदा भारताला सर्वाधिक १२ पदके ही कुस्तीमध्ये मिळाली. तसेच वेटलिफ्टिंग, अथलेटिक्स आणि बॉक्सिंग या खेळांमधील खेळाडूंनी भारताच्या पदकसंख्येत भर घातली. भारताला प्रथमच लॉन बॉल्स या खेळात एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळाले.
|
टिप्पणी पोस्ट करा