राज्याच्या राजकारणात नसल्याची खंत नाही – विनोद तावडे

 

ब्युरो टीम: राज्याच्या राजकारणात नसल्याची खंत नसून राष्ट्रीय राजकारणात मी आनंदी आहे. वेगवेगळ्या राज्यांचे राजकारण मला शिकायला मिळते. अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे  यांनी केली आहे. निवडणूक झाल्यावर सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच सर्व ठरत असल्यामुळे विस्ताराला फारसा विलंब होत नसतो. पण या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होणे अपेक्षित होता. शिवसेनेतून मोठा गट नाराज झाल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या गटाने भाजपसोबत युती केली. दोन्ही पक्षांचे मनोमिलन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. याआधीच्या सरकारने केलेले निष्क्रीयतेचे काम पाहता या सरकारकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

       बिहारमध्ये भारतीय जनता पक्षापासून संयुक्त जनता दल वेगळा झाला आहे. त्यावर विचारले असता, बिहारमध्ये भाजपचे आमदार जास्त असतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नितीशकुमार यांना भाजपचे मुख्यमंत्री केले. ते दोघेही या स्थितीतून मार्ग काढतील, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातदेखील भविष्यात असे होईल का? असे त्यांना माध्यमांनी विचारले. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. सद्यस्थितीनुसार काम करायचे असते. राज्याच्या राजकारणात नसल्याची मला खंत वाटत नाही. राष्ट्रीय राजकारणात काम करताना वेगळाच आनंद आहे. अनेक राज्यांतील राजकारण शिकायला मिळत असल्यामुळे मी दिल्लीतच आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने