२९ ऑगस्ट हा हॉकीपटू मेजर ध्यानचंदयांचा जन्म
दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा राष्ट्रीय
क्रीडा दिनाच्या निमित्ताने गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या
तरुणीने ध्यानचंद यांची रांगोळी रेखाटली आहे.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये (आताच्या प्रयागराज)
झाला होता. मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीचा हुकूमशाह हिटलरला देखील हॉकी खेळाच्या
माध्यमातून प्रभावित केलं होतं. सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने मेजर ध्यानचंद
यांची रांगोळी तयार करुन क्रीडाप्रेमींना नवचेतना देण्याचा प्रयत्न केला आहे. या
निमित्ताने क्रीडा क्षेत्राप्रती आवड निर्माण व्हावी असा रांगोळी चित्रकार सोनी
फुलसुंगेचा मानस होता. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य
साधून मेजर ध्यानचंद यांच्या रांगोळीला तिरंग्याच्या छटा दिल्या आहेत. तसेच केवळ
हॉकीच नाही तर इतर खेळांची देखील आठवण या माध्यमातून करुन दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा