विरोधी पक्षनेता म्हणून मी हजर राहणार

बहु चर्चित असलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सकाळी ११ वाजता राजभवनावर होणार आहे. या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात २० ते २२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाष्य केले असुन ते म्हणाले “आज सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ विस्तार आहे. यासंदर्भात मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून मी हजर राहणार आहे” तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारवर टीका देखील केली आहे. आमदार नाराज होऊ नये आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं म्हणूनच हा तात्पुरता मंत्रीमंडळ विस्तार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
           पुढे प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदाराच्या नाराजीवरही भाष्य केलं आहे. “कुणांचंही सरकार आलं तरी आमदार नाराज होतात. मंत्रीमंडळाचा विस्तार होतो, तेव्हा अनेकांना वाटतं की आपल्या मंत्रीपद मिळावं, ज्यांना संधी मिळत नाही. ते नाराज होतात. आज होणारा मंत्रीमंडळ विस्तार हा पूर्ण नाही,असे वाटते तश्या माध्यामांतदेखील चर्चा आहेत. कदाचित आमदारांची नाराजी दूर व्हावी आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं, यासाठी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होत नसावा, असा माझा अंदाज आहे”, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने