आदित्य ठाकरेंनी घेतले टेंभी नाक्यावर जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन


ब्युरो टीम : ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत शक्तिप्रदर्शन केले असतानाच, त्यापाठोपाठ जांभळी नाका येथे राजन विचारे यांच्या दहीहंडी उत्सवाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रात्री उपस्थिती लावली. या उत्सवाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

         शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेत असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या समर्थकांकडूनही आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख होत आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातून शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले आहे. या बंडखोरीनंतर आदित्य हे पहिल्यांदाच ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाच्यनिमित्ताने आले होते. आदित्य ठाकरे यांनी खासदार राजन विचारे यांच्या जांभळी नाका येथील दहीहंडीला हजेरी लावली. या उत्सवाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

---------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने