लाल किल्ल्यावरून पहिल्यंदाच डागली स्वदेशी तोफ

ब्युरो टीम: देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ मध्ये मिळाले. पण यानंतर साधारण ३० वर्षानंतर पहिल्यांदा जमीनीवरून हवेत मार करणाऱ्या मिसाइलच्या प्रोजेक्टची सुरूवात झाली. तेंव्हापासून आजपर्यंत देश स्वदेशी हत्यारे, मिसाइल व टँक याच्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा हॉवित्जर तोफांची सलामी दिली गेली. या तोफेचे नाव ॲडव्हांस्ड टोड आर्टिलरी गन सिस्टम (Advanced Towed Artillery Gun System- ATAGS) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या तोफांचे कौतुक केले.

       या तोफांना डीआरडीओ च्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलप्मेंट एस्टॅब्लीशमेंट (ARDE), टाटा ॲडव्हांस्ड सिस्टम्स लिमिटेड, महिंद्रा डिफेंस नेवल सिस्टम व भारत फोर्ज लिमिटेड यांनी मिळून बनवले आहे. ही तोफ 155 mm/52 कॅलिबरची आहे. नुकतेच राजस्थानच्या पोखरण फिल्ड फायरिंग रेंज मध्ये याचे यशस्वी परिक्षण झाले होते. या तोफेला कोणत्याही ठिकाणी नेऊन ठेवता येईल. अगदी पाकिस्तानची सीमा असो किंवा चीनच्या सीमेजवळ लदाखमध्ये.

     भारतीय सेनेजवळ 155 mm च्या या गन ७ आहेत. २०१६ मध्ये याचे पहिले परिक्षण झाले होते. ४० तोफांची ऑर्डर दिलेली आहे. याशिवाय अजून १५० तोफा बनवल्या जातील. ही तोफ चालवण्यासाठी ६ ते ८ लोकांची गरज असते. बर्स्ट मोडमध्ये १५ सेकंदात ३ राउंड, इंटेस मध्ये ३ मिनीटात १५ राउंड व ६० मिनीटात ६० राउंड फायर करतात. याची फायरिंग रेंज ४८ किलोमीटर आहे. याला वाढवून ५२ करण्याचा प्रयात्न सुरू आहे.

        या गनचे वजन १८ टन आहे. याची नळी म्हणजेच बॅरलची लांबी ८०६० मिलिमीटर आहे. हे माइनस ३ डिग्रीपासून प्लस ७५ डिग्रीपर्यंत एलिवेशन घेऊ शकतो. जर याला HE-BB किंवा हाय एक्सप्लोसिव बेस ब्लीड एम्यूनिशन लावले तर याची रेंज वाढून ५२ किलोमीटर होते. यात थर्मल साइट व गनर्स डिस्प्ले लागलेला आहे.

          ATAGS विकसित करायला सुमारे ४ वर्षे लागली. यातील ऑर्डिनेंस सिस्टम व रीकॉयल सिस्टम मुळे याला थोडा उशीर झाला. याला पहिल्यांदा प्रजासत्तक दिन २६ जानेवारी २०१७ च्या परेडला लोकांच्या समोर आणण्यात आले. आजवर याचे ६-७ परिक्षण झाले आहेत. भारताकडे अशा अजूनही तोफा आहेत. त्याविषयी जाणून घ्यावे.

         धनुष (Dhanush) : 155mm/45 कॅलिबर टोड हॉवित्जर धनुष ला २०१९ मध्ये भारतीय सेनेत दाखल करण्यात आले. हे बोफोर्स तोफेचे स्वदेशी व्हर्जन आहे. सध्या सेनेकडे १२ धनुष आहेत. ११४ ऑर्डर केले आहेत. ज्याची संख्या ४१४ होऊ शकते. आतापर्यंत ८४ बनवल्या आल्या आहेत. याला चालवण्यासाठी ६-८ क्रूची गरज आहे. याच्या गोळ्याची रेंज ३८ किलोमीटर आहे. बर्स्ट मोडवर १५ सेकंदात ३ राउंड डागतात. इंटेंस मोडवर ३ मिनीटात १५ राउंड व संस्टेंड मोडमध्ये ६० मिनीट मध्ये ६० राउंड होतात.

         एम 777 (M777) : 155mm लाइट टोड हॉवित्जर अमेरिकेतून भारतात मागवले गेले आहे. साधारण ११० हॉवित्जर भारतीय सेनेत आहेत. १४५ अजून ऑरडर करण्यात आले आहेत. याचे असेंबलिंग भारतात एका स्वदेशी कंपनीद्वारा करण्यात येणार आहे. या हॉवित्जर ने अफगाणिस्तान युध्द, इराक वॉर, सीरियी वॉरसहित अनेक युध्दांत चांगले प्रदर्शन केले आहे. याला चालवायला ८ क्रूची आवश्यकता असते. हे एका मिनीटात ७ गोळे डागतात. या गोळ्याची रेंज २४ ते ४० किलोमीटर आहे. याचे गोळे सुमारे एक किलोमीटर प्रती सेकंद वेगाने चालतात.

          हॉबिट्स FH77A/B बोफोर्स (Haubits FH77A/B Bofors) : भारतात एकूण ४१० बोफोर्स तोफ आहेत. ज्याला २०३५ पर्यंत धनुष हॉवित्जरने बदलले जाईल. या तोफेचा गोळा २४ किलोमीटरपर्यंत जातो. याचे ९ सेकंदात ४ राउंड फायर होतात. कारगिल युध्दात या तोफने हिमालयाच्या टोकावर बसलेल्या पाकीस्तानी शत्रूला मारले होते. आता भारताजवळ यापेक्षा चांगले धनुष हॉवित्जर आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने