आरएसएस राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणाले…

ब्युरो टीम: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस  राजकारणात उतरणार का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत  यांनी उत्तर दिले. विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.

     “देशाला सक्षम करण्यासाठी ९७ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू झाला. देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना एकाच नेत्याला करायचा नाही. नेता कितीही मोठा असला तरी सर्व आव्हानांचा एकटाच सामना करू शकत नाही. सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात. स्वातंत्र्ययुद्धाच्या सुरुवातीला अनेक लोक उभे राहिले. त्यात अनेकांचे बलिदान, अनेकांचे आयुष्य, लोकांच्या जीवनाची बरबादी, लोकांचे समर्पण व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले.” असे मोहन भागवत म्हणाले.

      “आज खूप मोठा वर्ग संघाशी जोडला असून समाजातील प्रत्येक घटकाचे लोक संघाशी जुळत आहेत. संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे सत्ता सोपवायला मागे- पुढे पाहणार नाहीत. मात्र, संघ कधीही सत्तेत येणार नाही. कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्षतेने काम करणे गरजेचे असते. आज जे विरोधक आहेत, भविष्यात त्यांना संघात आणायचे आहे.” असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने