गणेशोत्सव
अगदी जवळ येऊन ठेपला. मालिकांमध्येही आता घराघरांत गणपतीचं आगमन होणार आहे. आरत्या
रंगणार आहेत. गौर नाचणार आहे. प्रेक्षकांना पुढचे दहा दिवस खूप छान पाहायला मिळणार
आहे. नवा गडी नवं राज्य मालिकेतही आता कर्णिकांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे.
आतापर्यंतच्या भागात कर्णिकांच्या घरात
आनंदी स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते आहे. रमाच्या आणि आनंदीच्या कुरापतींमध्ये
त्यांची एका गोष्टीवर एकवाक्यता होते आणि ती म्हणजे दोघींची गणपती बाप्पावरची अपार
श्रद्धा. आनंदीला कळतं की राघवने रमा गेल्यापासून गणपतीची स्थापना केली नाही. पण
आता आनंदी ठरवते, तिच्या स्वतःच्या
आणि रमाच्या इच्छेसाठी तसंच कौटुंबिक आनंदासाठी पुन्हा गणपती बाप्पा बसवायचे.
आता सहा वर्षानंतर बाप्पा पुन्हा एकदा
कर्णिकांच्या घरी विराजमान होणार आहे. यासाठी आनंदी स्वत: गणपतीची मूर्ती करते.
त्यासाठी ती चिंगीलाही मदतीला घेते. चिंगीही मग हळूहळू आनंदीच्या जवळ जातेय. अगदी
पहिल्या दिवशीच आनंदीनं चिंगीला अंगाई गीत गाऊन निजवलं. मालिकेत आनंदी आणि रमा
एकमेकींना भेटतात. त्यांच्यातले संवादही खूप रंजक असतात. आनंदी राघवबरोबर संसारात
रुळायचा प्रयत्न करत आहे. आता गणपती घरी आल्यावर काही बदल होतोय का याची सगळ्यांना
उत्सुकता आहे.
सत्यनारायणाच्या पूजेला सासू आनंदीला
रमाची साडी भेट देते. ती घातल्यावर मात्र राघव ओरडतो. रमाच्या कपड्यांना आनंदीनं
हात लावला, म्हणून राघव तिला खूप
ओरडतो. तो म्हणतो, मी तुला हवं ते
आणून देईन. पण रमाच्या कपाटाला हात लावायचा नाही. तसं करण्याची तुझी हिंमतच कशी
झाली?
पल्लवी पाटील आणि अनिता दाते यांची
जुगलबंदी चांगलीच रंगतेय. पल्लवी पाटीलनं आनंदीच्या भूमिकेसाठी मालवणी भाषा शिकून
घेतलीय. ती एका मुलाखतीत म्हणाली होती, 'मालिकेतील कुटुंब हे मालवणी आहे, त्यामुळे मलाही मालिकेत मालवणी भाषा बोलावी लागणार होती. त्यासाठी मी ही भाषा
कशी बोलली जाते, त्यातील
नेहमीच्या वापरात असलेले शब्द कोणते याचे धडे घेतले. सेटवर काहीजण मालवणी आहेत
त्यांच्याकडून माहिती घेतली. काही मालवणी मैत्रिणींशी बोलले. आता मला ही भाषा
यायला लागली आहे. मालिका सुरू झाली की माझा मालवणीचा अभ्यास दिसेलच.'
टिप्पणी पोस्ट करा