भारतातील महत्त्वाच्या व्यक्तीवर आत्मघातकी हल्ल्याचा कट! रशियातून अतिरेक्याला अटक



ब्युरो टीम: देशावरचं एक मोठं संकट टळलं आहे.  भारतावरचा मोठा आत्मघातकी हल्ला  टळला आहे. देशातील एका महत्वाच्या व्यक्तीवरच्या हल्ल्याचा पर्दाफाश झालाय. रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं त्याने ही कबुली दिली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्याच घेतला. त्याने ही कबुली दिली आहे. भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार होता. यात एका रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला. त्याने ही कबुली दिली आहे. काही दिवसांआधी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयित बोट आढळली होती. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर आता ही आलेली बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

   हरिहरेश्वरला संशयित बोट आढळली!

       हरिहरेश्वरमध्ये काही दिवसांआधी एक संशयित बोट आढळली होती. यात AK 47 बंदुका आणि काही काडतूसं आढळून आली होती. एकूण तीन बंदुकांनी भरलेली बोट समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालेली. रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सकाळी आढळून आली होती. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी पाहणी केला. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने अवघा देश हादरला होता. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आणि आता तर खुद्द दहशतवाद्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.

----------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने