ब्युरो टीम: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केलं. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे. या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही."
अपघातानंतर बराच वेळ आपल्याला मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंच्या चालकाने केला आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी या अपघाताची चौकशी होणार असल्याचं सांगितलं आहे. सर्व आरोपांबद्दलची माहिती तपासून घेतली जाईल. पण ही घटना खूप दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी वगैरे सगळं होईल.
विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिली. त्यामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. सकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात सकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मेटेंचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातानंतर मेटेंना जवळच्याच कामोठे इथल्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोवर बराच उशीर झाला.
टिप्पणी पोस्ट करा