संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था, डीआरडीओ, तसेच भारतीय नौदलाने, आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2022 रोजी, ओदीशाच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर लघु पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत उभा मारा करण्यास सक्षम अशा (VL-SRSAM) क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली. भारतीय नौदलाच्या जहाजावरुन, एका उच्च गतीच्या, मानवरहित हवाई लक्ष्याचा भेद करुन, ह्या हवेत उभा मारा करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राचे प्रदर्शन करण्यात आले. या क्षेपणास्त्रावर, देशी बनावटीच्या रेडियो लहरी संवेदना असून,तयाच्या मदतीने क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला. डीआरडीओ नं भारतातच ही VL-SRSAM प्रणाली विकसित केली आहे.
प्रक्षेपण चाचणीच्या वेळी, उड्डाण मार्ग आणि वाहनाची कामगिरी मोजणाऱ्या मापदंडांनुसार उड्डाण डेटा वापरून त्याचे निरीक्षण केले गेले तसेच, रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम (EOTS) आणि आयटीआर, यांच्या टेलीमेट्री प्रणाली यांसारख्या विविध श्रेणी उपकरणांद्वारे ह्या निरीक्षणांची नोंद केली गेली.
संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, (डीआरडीएल), संशोधन केंद्र, इमरात (आरसीआय), हैदराबाद आणि आर अँड डी (संशोधन आणि विकास) इंजिनीअर्स, पुणे यासारख्या विविध प्रणालीची संरचना आणि विकासात कार्यरत, डीआरडीओच्या प्रयोगशाळांमधील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी ह्या प्रक्षेपणावर देखरेख ठेवली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी VL-SRSAM च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय नौदल आणि संबंधित सर्वांचे अभिनंदन केले. या क्षेपणास्त्रामुळे, भारतीय नौदलाची ताकद अधिक वाढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संरक्षण विभागाचे सचिव तसेच, संशोधन, डीआरडीओ चे अध्यक्ष आणि विकास विभागाच्या अध्यक्षांनी देखील, यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी संघांचे अभिनंदन केले. या चाचणीच्या यशाने, शस्त्र प्रणालीची प्रभाव सिद्ध केला आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाला अधिक बळकट करेल ज्यामुळे समुद्रातील शत्रूच्या लक्ष्यांसह जवळच्या अंतरावरचे विविध हवाई हल्ले निष्फळ करण्यात त्याची मदत होईल, असे ते पुढे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा