आयकर विभागाला (Income Tax Department ) जालन्यात हाती लागले घबाड.

आयकर विभागाने (Income Tax Department) स्टील टीएमटी बारचे उत्पादन करणाऱ्या दोन प्रमुख समूहांच्या मालकीच्या आस्थापनांच्या परिसरात गेल्या काही दिवसात तपास मोहीम राबवली. या तपास मोहिमेत जालना (Jalna), औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik) आणि मुंबई (Mumbai) येथील 30 पेक्षा जास्त परिसरांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले. यात एका समूहाच्या मालकीच्या फार्म हाउसवरील गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
           दोन्ही समूहांमधून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते अनेक संस्थांकडून बनावट खरेदीद्वारे खर्चाचा आकडा फुगवून मोठ्या प्रमाणात करचोरी करत होते. या संस्था जीएसटी (GST) बुडवण्यातही गुंतल्या असल्याचे आढळून आले आहे. छाप्यामध्ये 120 कोटी रुपयापेक्षा पेक्षा जास्त रकमेच्या कच्च्या मालाच्या साठ्याची नोंद नसल्याचे देखील आढळून आले आहे.
           एका समूहामधून हस्तगत झालेल्या पुराव्यांच्या तपासणीमधून असेही दिसून आले आहे की या समूहाने कोलकाता येथील शेल कंपन्यांकडून मिळवलेले बोगस असुरक्षित कर्ज आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून आपले बेहिशेबी उत्पन्न प्राप्त केले आहे. या समूहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सहकारी बँकांमध्ये उघडले गेलेले अनेक लॉकर्स देखील शोध पथकाला या तपासणीमध्ये सापडले आहेत. या तपास मोहिमेत सहकारी बँकांमधील लॉकर्ससह 30 पेक्षा जास्त बँक लॉकर्सचा शोध लागला आहे. या लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले आहेत. आतापर्यंत, या तपास मोहिमेत 56 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 14 कोटी रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर पुढील तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने