भारतीय नौदलातील (Indian Navy)शौर्य पुरस्कार विजेत्यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते सत्कार

पश्चिम नौदल कमांडने (Western Naval Command) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून,भारतीय नौदलाच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त झालेल्या शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि सन्मान केला. मुंबईमधील मुल्ला सभागृह येथे काल 10 ऑगस्ट 2022 रोजी हा कार्यक्रम पार पडला.महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हस्ते तीन वीर चक्र, पाच शौर्य चक्र आणि 30 नौसेना पदक (शौर्य) विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
           पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 निवृत्त अधिकारी आणि आठ निवृत्त खलाशी होते. ॲडमिरल व्ही.एस. शेखावत, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीआरसी (निवृत्त) यांना 1971 च्या युद्धात त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल सन्मानित करण्यात आले. इतर पुरस्कार विजेत्यांना 1971 चे युद्ध, ऑपरेशन पवन, ऑपरेशन रक्षक, बंडखोरीविरोधी अभियान, चाचेगिरी विरोधी आणि समुद्रामधील बचाव यासारख्या विविध मोहिमांमध्ये त्यांनी दाखवलेले शौर्य तसेच विविध मोहिमांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
           या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग (Vice Admiral Ajendra Bahadur Singh) यांनी केले. पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केल्यानंतर राज्यपालांनी (Governor of Maharashtra) उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने