बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ‘मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या लीगला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्ड कप ९ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्यानंतर लगेचच ही लीग घेण्याचा प्रस्ताव आहे. पुरुषांच्या आयपीएलआधी ही स्पर्धा संपविण्याचा विचार आहे. सध्या तरी आम्ही पाच संघांमध्ये ही लीग घेण्याचा विचार करीत आहोत. मात्र, गुंतवणुकदारांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही संख्या सहा होऊ शकते. यादरम्यान संघांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वी महिलांची आयपीएल पुढील वर्षी होणार असल्याचं निश्चित केलं आहे. बऱ्याच क्रिकेटप्रेमींचा असा विश्वास आहे, की महिलांची आयपीएल क्रांती घडवून आणेल आणि यामुळे भारतातील महिला क्रिकेटचा दर्जाही उंचावेल. ‘भागधारकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या संघांबाबत विचारणा सुरू झाल्या आहेत. अनेक जण संघ घेण्यासाठी उत्सुक आहेत,’ असं जय शहा यांनी वृत्तसंस्थेला मागे दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा