देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

 


             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 2600 खाटांच एका खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन केल आहे. रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्या मध्ये केंद्र सरकार कडून एक प्रयोगशाळा देखील चालू केली आहे. यावेळी हरियाणाचे राज्यापाल बंडारू दत्तात्रेय, आणि मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण उपस्थित होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले भारत हा असा देश आहे, जिथे आरोग्य आणि अध्यात्म यांचा जवळचा संबंध आहे.
         जवळपास 130 एकर जमिनीवर हे रूग्णालय उभारल आहे, रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित केंद्रीकृत प्रयोगशाळा, बाह्यरुग्ण विभाग (OPD) आहे. अमृत रुग्णालया मध्ये सात मजले आहेत. माता अमृतानंदमयी मठाच्या सहाय्याने सहा वर्षांच्या कालावधीत हे बांधले गेले आहे.
        सुपर स्पेशालिट रूग्णालयात सुरूवातीला 500 खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. पुढील पाच वर्षात हे पुर्ण क्षमतेने चालू केल जाईल. 81 वैशिष्ट्यांसह हे रुग्णालय पूर्णपणे तयार झाल्यानंतर, ते दिल्ली-एनसीआर आणि देशातील सर्वात मोठे रुग्णालय बनेल. रूग्णालयाचे "रेजिडेंट मेडिकल डायरेक्टर" डॉक्टर संजीव के सिंह, यांच्या माहिती नुसार सुरुवातीची ही योजना 2012 ला दिल्लीमध्ये उभारण्याची होती, परंतु शेवटी फरीदाबादमध्ये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
------------

      

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने