शरीरविक्रय व्यवसायातील (sex workers) व्यक्तींना केले राष्ट्रध्वजाचे वाटप.

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने (India Post, Mumbai Region ) आगामी 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आपल्या मातृभूमीबद्दल देशभक्ती आणि अखंडतेची भावना जागृत करण्यासाठी शरीरविक्रय व्यावसायिकांच्या घरी “तिरंगा”, राष्ट्रीय ध्वज वितरित केले. तसेच आज रक्षाबंधनाचे औचित्य साधत ‘सुरक्षा का बंधन, रक्षा बंधन’ या मोहिमेअंतर्गत कामाठीपुरा येथील शरीरविक्रय व्यवसायातील व्यक्तींसाठी स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. भारतीय टपाल खाते मुंबई विभाग यांनी कामा रुग्णालयाच्या सहकार्याने या तपासणी शिबिराचे आयोजन केले .
           या शिबिराचा लाभ 150 हून अधिक शरीरविक्रय व्यावसायिक यांनी घेतला. याचे आयोजन शरीरविक्रय व्यावसायिकांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात ठेऊन करण्यात आले होते. याशिवाय कामाठीपुरा येथील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना शिबिरही घेण्यात आले. त्यानंतर, भारतीय टपाल खात्याच्या, मुंबई विभागाच्या, पोस्टमास्टर जनरल, स्वाती पांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कामाठीपुराच्या 14 व्या गल्लीला भेट दिली आणि शरीरविक्रय व्यावसायिकांना राख्या बांधल्या.
           या कार्यक्रमा मागचा उदेश शरीरविक्री व्यावसायिक आणि त्यांच्या मुलांच्या प्रति प्रेम, समानता आणि आदराचे बंधन व्यक्त करणे हा होता. भारतीय टपाल खात्याचा मुंबई विभाग, शरीरविक्रय व्यवसायिकांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने