ब्युरो टीम: देशभरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत आहे. तसेच अशा अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण देखील भारतात इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी ट्रॅफिक नियम कठोर करणं खूप गरजेचं बनलं आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये वाहतुकीचे नियम खूप कड करण्यात आले आहेत. त्यामुळेच तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला २.४१ लाख रुपयांचा दंड आणि अनेक महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा नियम युनायटेड किंगडममधला आहे. तुम्ही जर युनायटेड किंगडममध्ये दारूच्या नशेत गाडी चालवत असताना पकडले गेलात तर या गुन्ह्यासाठी त्यांच्या देशात कठोर शिक्षेची तरतूद आहे. ही शिक्षा दंडाधिकारी आणि गुन्ह्याचे स्वरूप यावर अवलंबून असते. या गुन्ह्यासाठी तुम्हाला तुरुंगवास, वाहन चालवण्यास बंदी आणि मोठा दंड होऊ शकतो.
देशभरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत आहे. तसेच अशा अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण देखील भारतात इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी ट्रॅफिक नियम कठोर करणं खूप गरजेचं बनलं आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये वाहतुकीचे नियम खूप कड करण्यात आले आहेत. त्यामुळेच तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला २.४१ लाख रुपयांचा दंड आणि अनेक महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा नियम युनायटेड किंगडममधला आहे. तुम्ही जर युनायटेड किंगडममध्ये दारूच्या नशेत गाडी चालवत असताना पकडले गेलात तर या गुन्ह्यासाठी त्यांच्या देशात कठोर शिक्षेची तरतूद आहे. ही शिक्षा दंडाधिकारी आणि गुन्ह्याचे स्वरूप यावर अवलंबून असते. या गुन्ह्यासाठी तुम्हाला तुरुंगवास, वाहन चालवण्यास बंदी आणि मोठा दंड होऊ शकतो.
ब्रिटीश सरकारने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना आळा बसवण्यासाठी त्यांच्या आरटीओ नियमांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. त्यांच्या कायद्यानुसार, मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकाला तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक तुरुंगवास किंवा २.४१ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. यूके सरकारच्या वेबसाइटनुसार आरोपी चालकावर ड्रायव्हिंग बंदी लागू केली जाऊ शकते.
भारतात काय आहे नियम?
दारू पिऊन गाडी चालवणं हे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे वाहनचालक, तुमच्या वाहनात बसलेले इतर सहप्रवासी, रस्त्यावरील इतर वाहनचालक, पादचारी या सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी भारतातही सरकारने कडक नियम केले आहेत. ड्रिंक अँड ड्राईव्ह चालानच्या दंडाची रक्कम भारतात १० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही रक्कम पूर्वी २ हजार रुपये इतकी होती, जी अलिकडेच ५ पटींनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवताना पकडली गेली, तर त्या व्यक्तीला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, तसेच या कायद्यात ६ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, एकदा अशा गुन्ह्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई झाली असेल म्हणजेच दारू पिऊन वाहन चालवताना पकडले जाऊन तुमच्याकडून दंड वसूल केलेला असेल अथवा तुम्हाला या प्रकरणी शिक्षा झाली असेल आणि तुम्ही पुन्हा एकदा असंच कृत्य करताना आढळलात तर तुम्हाला आणखी मोठी शिक्षा होऊ शकते. म्हणजेच एकच व्यक्ती दुसऱ्यांदा दारून पिऊन गाडी चालवताना पकडली गेली, तर दंडाची रक्कम १५ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाते आणि त्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १८५ नुसार, तुम्ही अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली असताना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे.
टिप्पणी पोस्ट करा