राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी ११ वाजता शपतविधी होणार.

राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर होत आह़े मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. विविध मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे, खरी शिवसेना कोणती, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुरु आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळणार आहे.
           पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आह़े त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे.
           फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्र्यांची यादी निश्चित केली असून, या नेत्यांना दूरध्वनीवरुन निरोप देण्याचे काम दिवसभर सुरू होते. भाजपकडून अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. मुंबई-ठाण्यातील नेत्यांना सोमवारी रात्री उशिरा निरोप देण्यात येत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने