अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये 01ऑक्टोबर 2022 पासून बदल.

 


कामगार वर्गाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने 7 वर्षांपूर्वी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली होती. या योजनेत सामील होणार्‍या कर्मचार्‍यांना वृद्धापकाळात दरमहा पेन्शन मिळण्याची हमी आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना कोणत्याही आर्थिक संकटाशिवाय आरामात वृद्धापकाळ पार करण्याची संधी मिळते. परंतू  या योजनेच्या नियमांमध्ये आता  बदल करण्यात आले आहेत, जे पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत.

अटल पेन्शन योजना काय आहे: असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अटल पेन्शन योजना चालवली जात आहे. या योजनेत सामील होणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला ठरावीक पेन्शन दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत किमान 42 रुपये दरमहा आणि कमाल 1454 रुपये जमा करावे लागतील. या अंतर्गत, वयाच्या 60 व्या वर्षी, दरमहा किमान 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. दरमहा गुंतवलेल्या रकमेच्या आधारावर पेन्शनची रक्कम निश्चित केली जाते.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने 1 जून 2015 रोजी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. आकडेवारीनुसार, या वर्षी मार्चपर्यंत 4 कोटीहून अधिक लोक अटल पेन्शन योजनेत सामील झाले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या आयकरदात्यांना पुढील महिन्यात १ ऑक्टोबरपासून वगळण्यात येईल. त्यासाठी सरकार वेळोवेळी खात्यांचा आढावा घेणार आहे.

अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल करताना अर्थ मंत्रालयाच्या करदात्यांना 1 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले होते की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व करदात्यांना 1 सप्टेंबर 2022 पूर्वी योजनेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. 30 सप्टेंबरपर्यंत योजनेचे सदस्यत्व घेऊन खाते उघडण्याचा सल्ला देण्यात आला होता. जे करदाते हे करू शकले नाहीत, ते १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेतून बाहेर पडतील. 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेअंतर्गत, अर्जदाराला जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने