चालू आर्थिक वर्षाच्या 1ल्या तिमाहीत देशातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 30% वाढ.

 

ब्युरो टीम: चालू आर्थिक वर्ष, 2022-23 च्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जुलै या कालावधीत, देशातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 30% वाढ होऊन, ही निर्यात, 9598 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वर्ष 2022-23 साठी कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगांनी, 23.56 अब्ज डॉलर्सपर्यंतच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले असुन. त्यातील, 9.59 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य केवळ या पहिल्या तिमाहीतच पूर्ण झाले आहे. अशी माहिती, वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (DGCI&S) जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार समजते .

वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (DGCI&S) जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या ह्याच कालावधीच्या तुलनेत, ताजी फळे आणि भाज्या यांच्या निर्यातीत 4%  वाढ झाली असुन, प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 51% अशी  मोठी वाढ दिसून आली. एप्रिल ते जुलै 2021 या काळात, ताजी फळे आणि भाज्या यांची निर्यात 498 डॉलर्स इतकी झाली होती, जी आता या वर्षात 517 डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

आकडेवारीनुसार, देशातील कृषी उत्पादनांची निर्यात, 2021-22 या आर्थिक वर्षांत 19.92 % वाढून 50.21 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. कृषी आणि अन्न प्रक्रियाकृत उत्पादने निर्यात प्रोत्साहन परिषदेने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे ज्यात नव्या बाजारपेठाचा नियमित शोध, भारतीय दूतावासांच्या मदतीने विपणन प्रोत्साहन मोहिमा आयोजित करणे याचा समावेश आहे, यामुळे हि निर्यातीतील वाढ नोंदवली गेली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने