कंपनीची फिट कर्मचाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांची ऑफर.

 


तुम्ही कधी ऐकले आहे की एखादी कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी बोनस देते? परंतु ऑनलाइन ब्रोकिंग फर्म झीरोदा (Zerodha fit employee challenge) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंज आणले आहे. आव्हान पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाईल. याशिवाय कंपनीने यासाठी 10 लाख रुपयांचा लकी ड्रॉही ठेवला आहे.

झीरोदाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी याबाबत सांगितले त्यांचा हा उपक्रम आरोग्याशी संबंधित आहे. त्यांनी कर्मचार्‍यांना तंदुरुस्त राहण्यासाठी दैनंदिन ध्येय निश्चित करण्यास सांगितले आहे. जो कर्मचारी एका वर्षासाठी दररोज त्या उद्दिष्टाच्या 90% साध्य करेल त्याला एका महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाईल.

ते पुढे म्हणाले, आमच्या टीममधील बहुतेक लोक घरून काम करत आहेत. अशा स्थितीत त्यांना धूम्रपान आणि जास्त वेळ एका जाग्यावर बसण्याची सवय लागली आहे, त्यामुळे त्यांची तब्येतही बिघडत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने कर्मचार्‍यांना फिटनेस ट्रॅकर वापरण्यास आणि दररोज एक ध्येय निश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच अतिरिक्त पगार बोनस म्हणून मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दैनंदिन उद्दिष्टाच्या 90% उद्दिष्ट पुर्ण करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने