16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76% मतदान

 

राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76% मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. अशी माहिती राज्य निवडणुक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे 

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10% मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने