अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी हिने बिग बॉस 16 शो नाकारला.


 

मॉडेल आणि अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बिग बॉस 16 सारख्या वादग्रस्त शोचा भाग होण्यास तयार नाही तिने हा शो नाकारल्याची बातमी आली आहे. या आधी तिने उडियान या शोमध्ये तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

 बिग बॉस 16 हा शो दसऱ्यापासून प्रसारित होणार आहे. पहिला प्रोमो सध्या बाहेर आला असून  त्याला पहिल्या नंतर असे वाटते की सीझन 16 हा काही प्रकारे लॉक अप सारखा असु शकतो. अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सृती झा, जन्नत जुबेर आणि फैसल शेख या स्टार्सनी या आधीच शो नाकारल्याच्या बातम्या आल्या आहेत. अलीकडे, या शोसाठी स्टार मिळवणे कठीण झाले आहे. अनेकांना या शोच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे त्यांच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम होण्याची भीती वाटते. पण काही जणांनसाठी  बिग बॉस व्यावसायिकदृष्ट्या गेम चेंजर असू शकतो असे आपल्याला दिवंगत सिद्धार्थ शुक्ला, असीम रियाझ, शहनाज गिल, तेजस्वी प्रकाश यांच्या उदाहरण वरून समजते.

मॉडेल प्रियंका चहर चौधरीला तिचा पहिला मोठा ब्रेक 'उदारियां' मध्ये मिळाला होता. ती शो मधुन बाहेर पडताना भावूक झाली होती. उदारियांची संधी दिल्याबद्दल अभिनेत्री  प्रियंका चहर चौधरी हिने निर्माते रवी दुबे आणि सरगुन मेहता यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने