कोविड-19 हा साथीचा रोग नजीकच्या भविष्यात संपुष्टात येऊ शकतो: WHO

 


जगभरात आतापर्यंत कोविड-19 (COVID-19) मुळे झालेल्या मृत्यूची संख्या गेल्या आठवड्यात मार्च 2020 नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे तसेच  कोविड-19 हा साथीचा रोग नजीकच्या भविष्यात संपुष्टात येऊ शकतो,असे WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी बुधवारी जिनिव्हा येथे एका पत्रकार परिषदेत नमुद केले.

ते म्हणाले "गेल्या आठवड्यात, कोविड-19 मुळे साप्ताहिक मृत्यूची संख्या मार्च 2020 नंतर सर्वात कमी होती," तसेच  "आम्ही साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठीच्या स्थितीत नव्हतो, आम्ही अद्यापहि त्या स्थितीत नाही, परंतु साथीचा रोगाचा अंत दृष्टीक्षेपात आहे." त्यांनी या रोगाविरूद्धच्या लढाईची तुलना मॅरेथॉनशी केली आणि म्हणाले "आम्ही अंतिम रेषा पाहू शकतो. आम्ही विजयी स्थितीत आहोत. परंतु आता धावणे थांबवण्यासाठीची योग्य वेळ नाही." यामुळे, त्यांनी जागतिक समुदायाला संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले. "आम्ही आता ही संधी न घेतल्यास, आम्ही एकप्रकारे, अधिक मृत्यू, अधिक व्यत्यय आणि अधिक अनिश्चिततेचा धोका पत्करुत, म्हणून या संधीचा फायदा घेऊया". त्यांनी सर्व देशांना आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध लोकांसह सर्वात जोखीम असलेल्या गटांना पूर्णपणे लस घेण्याचे आवाहन केले. 

बुधवारी प्रकाशित झालेल्या WHO च्या साप्ताहिक महामारीविषयक आकडेवारी नुसार, गेल्या आठवड्यात जगभरात 3.1 दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस संसर्ग झाला आहे आणि सुमारे 11,000 लोक मरण पावले आहेत. मागील सात दिवसांच्या तुलनेत संसर्गाची संख्या 28% कमी झाली आहे तर मृत्यूची संख्या 22% कमी झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने