200 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ नेणारी एक पाकिस्तानी बोट ताब्यात.

 


गुजरात एटीएसकडून प्रसिध्द झालेल्या  माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (IMBL) क्षेत्राच्या जवळच्या भागात गस्त घालण्यासाठी दोन वेगवान आंतररोधी श्रेणीतील C-408 आणि C-454 हि जहाजे तैनात असताना. या गस्ती करणाऱ्या  जहाजांना भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी (Pakistan) बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या जहाजांनी ही बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले. भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) यात संयुक्तपणे कारवाई केली. बोटीवर सुमारे 200 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलोग्रॅम असलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.  

हि कारवाई 13-14 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री करण्यात आली पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येईल. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे. भारतीय किनाऱ्यावरचे सुरक्षा जाळे मजबूत असून त्याच्याशी संबधित यंत्रणांमध्ये असलेल्या प्रभावी समन्वयाचे महत्त्व या कारवाईमुळे अधोरेखित झाले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने