2014 पूर्वीच्या तुलनेत, नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना 77% कमी.

 


2014 पूर्वीच्या तुलनेत, नक्षलवादी (Naxal) हिंसाचाराच्या घटना 77 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. नक्षलवादविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा परिणाम म्हणून, प्रथमच छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर स्थित ' बूढा पहाड़ ' आणि बिहारच्या चक्रबांध आणि भीमबांधच्या अति दुर्गम भागात प्रवेश करून नक्षलवाद्यांना त्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानातून हुसकावून लावण्यात आले आणि तिथे सुरक्षा दलांच्या कायमस्वरूपी छावण्या उभारल्या आहेत. हे संपूर्ण क्षेत्र देशातील  प्रमुख नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी जप्त केले. 

नक्षलवाद्यांविरोधात 2019 पासून विशेष रणनीती अवलंबली जात आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आणि संबंधित यंत्रणांचे समन्वित प्रयत्न आणि राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे नक्षलविरोधी लढ्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. या निर्णायक यशाबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालय नक्षलवाद आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण सुरूच ठेवेल आणि हा लढा अधिक तीव्र केला जाईल.

2022 मध्ये नक्षलवाद्यांविरोधातल्या लढ्यात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबांधमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये 7 नक्षलवादी मारले गेले आणि 436 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. झारखंडमध्ये 4 नक्षलवादी ठार झाले आणि 120 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. बिहारमध्ये 36 नक्षलवाद्यांना अटक झाली / आत्मसमर्पण केले. तसेच मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. 

 2009 मध्ये 2,258 इतक्या सर्वोच्च हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या. 2021 मध्ये या घटना 509  या संख्येपर्यंत खाली आल्या आहेत. हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ही 85 टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2010 मध्ये, ही मृत्यूची संख्या 1005 अशी सर्वाधिक होती. ती 2021 मध्ये 147 मृत्यु  इतकी कमी झाली. नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाचे क्षेत्रही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. 2010 मध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव  देशभरातील 96 जिल्ह्यांमध्ये होता. 2022 मध्ये त्यांचे केवळ 39 जिल्ह्यांवर त्यांचे वर्चस्व उरले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने