राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित: धर्मेंद्र प्रधान

 


राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे मोठ्या प्रमाणात स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित आहे, स्वामी विवेकानंदांपासून ते श्री अरबिंदो आणि महात्मा गांधींपर्यंत कित्येक महान व्यक्तींनी  देशाला पुढे नेण्यासाठी  प्रगतिशील आणि सभ्यतेची मूल्ये रुजलेल्या  शिक्षण शैलीची कल्पना मांडली आहे, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले ते  रामकृष्ण मिशनच्या  ‘जागरण’  या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. केंद्रीय शिक्षण,  

रामकृष्ण मिशनला विद्यार्थ्यांना  व्यवहारात उपयोगी होईल असे शिक्षण देण्याचा मोठा वारसा आहे. आजच्या घडीला आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करत असताना, इयत्ता पहिली ते आठवीसाठी शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्याबरोबरच . इयत्ता 9 वी ते 12 वी साठी अशा प्रकारचे मूल्याधिष्ठित शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यावर देखील भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. हा अनोखा उपक्रम म्हणजे यादृष्टीने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्याद्वारे  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या तत्वज्ञानानुसार विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ शकेल.

आपली शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय प्राधान्यक्रमाशी संलग्न असायला हवी यावर प्रधान यांनी भर दिला. आपल्याला 21 व्या शतकातील नागरिकांना जागतिक स्तरावर जबाबदारी घेण्यासाठी सक्षम केले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या नेतृत्वाखालील सर्वांगीण शिक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण  2020 हे त्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बालवाटिका ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये जीवनातील आव्हानांसाठी सज्ज असलेला आणि राष्ट्रीय प्रगती आणि जागतिक कल्याणासाठी कटिबद्ध असलेला एक प्रतिभासंचय तयार करण्यासाठी सर्व शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी  एक आरखडा तयार करावा असे आवाहन प्रधान यांनी केले.

यावेळी रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी शांतात्मनंद, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) अध्यक्ष  निधी छिब्बर, केंद्रीय विद्यालय संघटना ( केव्हीएस ) , नवोदय विद्यालय समिती. (एनव्हीएस ) आणि मंत्रालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने