आधारचा वापर करून ऑगस्ट 2022 मध्ये 23.45 कोटी ई- केवायसी व्यवहार

 


देशातील नागरिक आधारचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि स्वीकार करत असल्याचे दिसून येत असून ऑगस्ट महिन्यात आधारच्या माध्यमातून 219.71 कोटी रुपयांचे प्रमाणीकरण व्यवहार करण्यात आले आहेत जुलै 2022 च्या तुलनेत या प्रमाणात 44% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यापैकी बहुतांश व्यवहार बोटांचे ठसे घेवून बायोमेट्रिक प्रमाणीकरण (128.56 कोटी) वापरून केले आहेत. त्या खालोखाल भौगोलिक प्रमाणिककरण आणि ओटीपी प्रमाणिकरणाचा वापर करण्यात आला.

ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत आधार प्रमाणीकरणांची एकूण संख्या  8074.95  कोटी इतकी झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ही एकूण संख्या 7855.24 कोटी इतकी होती. ऑगस्ट महिन्यात आधारव्दारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची संख्या 23.45 कोटी आहे. जुलै महिन्यातील एकूण ई-केवायसी व्यवहारांची संख्या 1249.23 कोटी इतकी होती, ती वाढून, ऑगस्टअखेरपर्यंत  1272.68 कोटी इतकी झाली आहे. 

ऑगस्ट महिन्यात नागरिकांनी  1.46  कोटी आधार  यशस्वीपणे अद्ययावत केले आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आतापर्यंत 65.01 कोटी आधार क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. त्याशिवाय आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) च्या माध्यमातून आणि मायक्रो एटीएम जाळ्याच्या माध्यमातून 1,528.81 कोटी  बँकिंग व्यवहार झाले आहेत. यापैकी सुमारे 22 कोटी व्यवहार एकट्या ऑगस्ट महिन्यात झाले आहेत.  अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय द्वारा प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रात देण्यात आली आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने