शिर्डी येथील साईबाबा दरबारात हैद्राबाद येथील साईभक्ताने साई चरणी 214.45 ग्रॅम सोन्याची फुले अर्पण केली

 


        शिर्डी येथील साईबाबा दरबारात आज हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एम.राजेंद्र रेडडी यांनी साई चरणी 214.45 ग्रॅम वजनाचे 9 लाख 98 हजार 479 रुपये किंमतीचे तीन सोन्‍याचे फुले अर्पण केली. सदरची फुले त्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. 

        साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सदरची देणगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी स्वीकारली, याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी तथा मुख्‍यलेखाधिकारी कैलास खराडे, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी व देणगी साईभक्‍त उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने