जपान-भारत यांचा संयुक्त सागरी सराव जिमेक्स-22 (JIMEX 22) संपन्न.

 


17 सप्टेंबर 22 रोजी पारंपारिक स्टीम पास्टसह (परेड सह) भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान-भारत सहावा सागरी सराव 2022, जिमेक्स-22 (JIMEX 22) चा  बंगालच्या उपसागरात समारोप झाला.  आठवडाभर चाललेल्या या सरावात,फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीटचे  रिअर अडमिरल संजय भल्ला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्याचबरोबर कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोरचे रिअर अडमिरल हिराता तोशियुकी यांच्या नेतृत्वाखालील जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF) ची जहाजे इझुमो आणि ताकानामी यांनी भाग घेतला.

हा सराव दोन्ही देशांच्या नौदलाने संयुक्तपणे केलेल्या काही अत्यंत जटिल सरावांचा साक्षीदार ठरला. दोन्ही देशांच्या सैन्याने आधुनिक स्तरावरील पाणबुडीविरोधी युद्ध, शस्त्रात्राने गोळीबार आणि हवाई संरक्षण आदी युध्द कौशल्यांचा सराव केला. शिपबोर्न हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि पाणबुड्याही या सरावात सहभागी झाल्या होत्या. भारतीय नौदल (Indian Navy) आणि जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF)च्या जहाजांनी  जहाजे पुरवठा आणि सेवांसाठी परस्पर तरतुदीच्या करारानुसार परस्परांसमवेत  संयुक्तपणे हे अभियान आयोजित केले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने