अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 7 अब्ज डॉलरची घट.

 


अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एका स्थानाच्या घसरणीसह आता ते  तिसऱ्या स्थानी गेले आहेत. याचा अर्थ अदानी आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती नसून तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. त्याचबरोबर या यादीत अदानीनां मागे टाकत जेफ बेझोस श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅस वगळता अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स मंगळवारी घसरणीसह बंद झाले. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे अदानीच्या नेटवर्थमध्ये ही घट दिसून आली आहे. यामुळे अदानी यांची संपत्ती 135 अब्ज डॉलरवर आली आहे. आता ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत $58.5 बिलियनची वाढ झाली आहे.

ACC आणि अंबुजा सिमेंटच्या अधिग्रहणानंतर, अदानी समूह हा भारतातील मार्केट कॅपच्या दृष्टीने सर्वात मोठा व्यवसाय समूह बनला असून. या समूहाचे एकूण मार्केट कॅप 22 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाच्या नऊ सूचीबद्ध कंपन्यांपैकी किमान चार कंपन्यांनी यावर्षी 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने