'राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन नव्हे, 50 गट, माझाही एक वेगळा गट- एकनाथ खडसे

 

ब्युरो टीम : मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपरोधिक विधान करत प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन नव्हे तर तब्बल पन्नास गट आहेत. यात माझाही एक वेगळा गट असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी करत मंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार टोला लगावला.

      एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुक्ताईनगर येथील निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

         राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 50 आमदारांचे 50 गट असल्याचं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. माझाही वेगळा गट असल्याचेही खडसे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षांमध्ये एक गट आणि दोन गट नसतात. पक्ष एकच असतो एक संघाचा असतो. मात्र वैचारिक मतभेद असू शकतात. वैयक्तिक मतभेद असू शकतात. पण याचा अर्थ पक्षामध्ये मतभेद आहे, असा आरोप करणे चुकीच आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

     काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबात प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले की, "मी सुद्धा नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजकारणात भेटीगाठी ही संस्कृतीच असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सगळेच भेटतात. अशोक चव्हाण यांना सगळेच भेटतात. मीही कधीतरी कामानिमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकासकामानिमित्ताने मी भेट घेऊ शकेल. मात्र याचा काही वेगळा अर्थ काढू नये, असं मला वाटतं", असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

      चोरा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे शिंदे गटात गेले की शिंदे गटाचे भाजपमध्ये आले, यामुळे फारसा काही फरक पडत नाही. हे सांगत असतानाच खडसे यांनी घी खिचडी मे गया असे समजून चालायचे असते, असा टोलाही लगावला.

       मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी मंजूर असलेला 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या कामांना किती निधी मिळवला आहे? कामे मंजूर असतानाही दुर्दैवाने हा निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे विकासकामांचा खेळ करण्याचा हा करंटेपणा असल्याची जोरदार टीका एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने