5 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचीही पतंजली समूहाची योजना

 


आताच्या 40,000 कोटींवरून येत्या पाच ते सात वर्षांत 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा पतंजली समूहाचा मानस आहे. बाबा रामदेव यांनी एका पत्रकार परिषदेत हि माहिती दिली ते पुढे म्हणाले पुढील पाच वर्षांत पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली लाइफस्टाइल आणि पतंजली मेडिसिन या चार कंपन्यांना शेअर मार्केट मध्ये सुचीबद्द  करणार आहेत तसेच पुढील पाच वर्षांत 5 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साध्य करण्याचा देखील समूहाचा मानस आहे. ज्यातुन येत्या पाच वर्षाच्या कालावधीत 5 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचीही समूहाची योजना आहे. 

पतंजली समूहाची, पतंजली फूड्स ही सूचीबद्ध संस्था आहे, जी पूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज या नावाने ओळखली जात होती. तसेच पतंजली वेलनेस अंतर्गत, कंपनीची  25,000 बेडची आरोग्य सेवा चालवण्याचा निर्धार असुन सध्याच्या 50 केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचा मानस आहे. रामदेव म्हणाले, “आम्ही 1लाख पतंजली वेलनेस सेंटर्स उघडण्याचा विचार करत आहोत आणि अॅलोपॅथी उपचार कमी करू इच्छितो कारण शस्त्रक्रियेशिवाय त्याची गरज नाही."

रामदेव म्हणाले, पतंजली फूड ब्रँडची बदनामी करणाऱ्यांविरोधात आम्ही 100 कायदेशीर नोटिसा पाठवल्या आहेत आणि एफआयआर देखील नोंदवल्या आहेत, पण कोणाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे हे त्यांनी  सांगितले नाही. तसेच पतंजलीने 11 राज्यांतील 55 जिल्ह्यांमध्ये 1.5 दशलक्ष हेक्टर जमिनीवर तेल पाम लावण्याची आणि यातुन पुढील 5-7 वर्षांत 2,000 कोटी रुपयांचा वार्षिक परतावा मिळवण्याची योजना आखली आहे. बाबा रामदेव म्हणाले, ऑइल पाम लागवड पुढील 40 वर्षांसाठी परतावा देईल आणि भारत खाद्यतेलाच्या आयातीवर खर्च होणारा पैसा वाचवू शकेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने