अपघात झाल्यावर कार्सच्या बाजूंवर आघात झाल्यास होणाऱ्या प्रभावापासून प्रवाशांची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करून सुरक्षा वैशिष्ट्ये वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिसूचनेचा मसुदा 14 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आला होता, ज्यात 1 ऑक्टोबर 2022 नंतर तयार होणाऱ्या M1 श्रेणीच्या वाहनांत दोन्ही बाजूंना पहिल्या रांगेत बसणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येकी एक अशा दोन टोर्सो एअर बॅग्ज, तसेच दुसऱ्या रांगेत बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येकी एक अशा दोन बाजूचे पडदे/ट्यूब एअर बॅग्ज बसविणे बंधनकारक करण्यात आले होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की चार चाकी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, याचा त्या गाड्यांची श्रेणी आणि किमतीशी काही संबंध नाही. जागतिक पुरवठा साखळीच्या मर्यादांमुळे वाहन क्षेत्रासमोर असलेल्या समस्या, आणि त्याचा सूक्ष्म अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता, प्रवासी कार्स (M-1 Category) मध्ये किमान सहा एअर बॅग्ज अनिवार्य करण्याचा प्रस्ताव 1 ऑक्टोबर 2023 पासून अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा