पॉर्नोग्राफीशी संबंधित 67 वेबसाईट्स बंद करण्याचे सरकारचे आदेश.

 


दूरसंचार विभागाने पॉर्नोग्राफीशी संबंधित 67 वेबसाईट्स बंद करण्याचा इंटरनेट सेवा पुरवठादारांना आदेश दिला आहे. माहिती तंत्रज्ञान नियमांचं (Information Technology Rules 2021) उल्लघंन केल्याने दोन उच्च न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा देणाऱ्यांना याबात पत्रं पाठवली आहेत, ज्यामध्ये एकूण 67 वेबसाईट्सवर कारवाई कऱण्याचा आदेश आहे. 

यामधील 63 वेबसाईट्सवर पुणे उच्च न्यायालयाच्या, तर चार वेबसाईट्सवर उत्तराखंड उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या आदेशाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानेही यासंबंधी आदेश दिला आहे . दूरसंचार विभागाने आदेशात म्हंटले आहे या वेबसाईट्स वरील साहित्य अश्लील असून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोतवत आहेत, या वेबसाईटने नियमांचं उल्लंघन केल्याने हि कारवाई करत असल्याचं कळते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने