तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले.

 


तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत.  भारतात आता आणण्यात आलेल्या चित्त्यांमध्ये पाच मादी तर तीन नर आहेत. या चित्त्यांपैकी मादी या दोन ते पाच वयोगटातील आहेत तर नर हे साडेचार ते साडेपाच वर्षे वयोगटातील आहेत. मात्र अफ्रिकन चित्ते हे आशियाई चित्त्यांपेक्षा वेगळे आहेत. आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेतील का, या विषयी शंका घेतली जात आहे. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने त्यांना मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यातील तिघांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या विलगीकरण कक्षात सोडण्यात आले आहे.

भारतात राजा महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती. त्यानंतर भारत सरकारने 1952 मध्ये चित्ता नामशेष झाल्याचं घोषित केलं होतं. तेव्हापासून भारतात एकही चित्ता नाहीये. 2009 मध्ये भारत सरकारने इतर देशातून चित्ते आणून त्याचं संधारण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली. आज अफ्रिकेतून तब्बल 8 चित्ते भारतात आणले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने