राज्य सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार


        केंद्रीय सहकार मंत्रालय (Ministry of Cooperation)आयोजित राज्य सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे सुरवात होत असुन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) हे ह्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांच्यासह 36 राज्ये  आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार मंत्री(Cooperation minister of states) आणि अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सहकार निबंधक आणि प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

         'सहकार से समृद्धी' या भावनेने सहकाराशी संबंधित लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी.6 जुलै 2021 रोजी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या  नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाचे कामकाज सुरु आहे. ही परिषद अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा आणि समन्वयाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यायोग्य धोरण/नियोजन संबंधी रूपरेषा तयार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देईल तसेच यात सहकार समित्यांचे संपूर्ण  जीवन चक्र तसेच त्यांचा  व्यवसाय आणि परिचालन संबंधी सर्व पैलूंचाही समावेश असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने