व्हिडिओ व्हायरल झाला अन तब्बल 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

 


मुलींच्या वसतिगृहातीलच एका मुलीने इतर मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. मुलांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप झाला, अन विद्यापीठात शनिवारी रात्री अडीच वाजता प्रचंड गोंधळ झाला. हा प्रकार पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी विद्यापीठात घडल्याचे वृत्त एका मीडिया हाऊसने दिले आहे. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या गेट क्रमांक २ वर देखील विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. वसतिगृहातील आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले असुन. आत्महत्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आंघोळ करतानाचा बऱ्याच विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. एका खासगी विद्यापीठातील मुलींच्या बाथरूममधून व्हिडिओ बनवताना आरोपी तरुणीला रंगेहात पकडण्यात आले आहे.हि विद्यार्थीनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत असे. त्या मुलानी ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर मुलींचा एमएमएस व्हायरल करणारा मुलगा शिमलाचा ​​रहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने