तुम्ही कधी एलियन्स (aliens) पाहिले आहेत का ?

 


परग्रहावरील जीव म्हणजेच एलियन्सविषयी (aliens)  तुम्ही बरेचदा ऐकले असेल कदाचित वाचले देखील असेल, परंतु तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का या प्रश्नाचे उत्तर जवळजवळ सर्वजण ‘नाही’ असेच देतील. पण भारतात (India) एक असे ठिकाण आहे  जेथे  नेहमीच दूसऱ्या ग्रहावरील जीव येत जात असतात. हे ठिकाण म्हणजे लडाख (Ladakh) येथील कोंग्काला दर्रा. हे ठिकाण वैज्ञानिकांसाठी नेहमीच एक रहस्य राहिले आहे. 

लडाख हे त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथे एक ठिकाण आहे, ज्याला ‘एलियन्सचा अड्डा’ म्हणून देखील ओळखले जाते. लडाखच्या कोंग्काला दर्रामध्ये (Kongkala Pass) एक रहस्यमय जागा आहे. येथे एलियन्स दिसल्याचा दावा अनेकदा करण्यात आलाय. म्हणूनच या भागाला ‘एलियन्सचा अड्डा म्हणतात. हा असा परिसर आहे, जिथे कोणीही राहत नाही. एलियन्स खरोखर येथे येतात की नाही, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी 2004 मध्ये अभ्यास केला. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासादरम्यान लडाखच्या याच भागात एक रोबोट फिरताना दिसला. पण वैज्ञानिक तेथे जाताच, ती वस्तू गायब झाली होती.

या रहस्यमय जागेबाबत वैज्ञानिकांची वेगवेगळी मते आहेत. काही वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, कोंग्काला दर्रा हा जगातील सर्वात जुना आहे. हा एक अतिशय मजबूत खडक आहे. यामुळे यूएफओ( UFO) येथे येऊ शकतात. तर, काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, येथे एलियन्स किंवा यूएफओ याचे कोणतेही अस्तित्व नाही. कारण येथे त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. तसेच, याभागात एलियन्स दिसत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर, 2012 मध्ये डीआरडीओ(DRDO) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने(NTRO) यांनी येथे एकत्र तपास आणि संशोधन केल्यानंतरही दोन्ही संस्था कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.

जून 1947 रोजी वॉशिंग्टनमधील माऊंट रेनियरजवळ नऊ हाय-स्पीड ऑब्जेक्ट्स प्रथमच उडताना दिसले होते. यावेळी लोकांना युएफओ बद्दल जागरूक करणे खूप महत्वाचे आहे, अशी घोषणा करण्यात आली होती. लोकांना दुसऱ्या ग्रहावर असणाऱ्या जीवसृष्टीबाबत माहिती देणे आवश्यक आहे, असेही म्हटलं होतं. आपल्या आकाशगंगेत पृथ्वीसारखे लाखो ग्रह असतील, असे वैज्ञानिकांचे मत असेल, तर त्यातील काही ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते. या ग्रहांवरही मानवासारखे प्राणी आणि पक्षी असतील. कदाचित त्यांच्यापैकी काही पृथ्वीवरील मानवजातीपेक्षा कमकुवत असतील, तर काही मानवजातीपेक्षा अनेक पटीने बुद्धिमान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असतील. अशाच लोकांना वैज्ञानिका एलियन्स असे म्हणतात.

एलियन्स हा विषय नेहमीच गूढ राहिला आहे. खरचं एलियन्स आहेत का नाही, याविषयी विविध मतभेद आहे. पण भारतातील लडाखच्या कोंग्काला दर्रा हे ठिकाण वैज्ञानिकांसाठी नेहमी एक रहस्य राहिले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ने याबाबत वृत्त दिल आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने