विशिष्ट रंगाच्या बाटलीत का पॅक करतात बिअर (Beer) ? जाणून घ्या

 


बिअर  (Beer) हे जगभरातील एक लोकप्रिय पेय आहे. पार्टीची रंगत वाढवायची असेल किंवा एखादे सेलिब्रेशन ( celebration ) करायचे असेल तर अनेकजण  बिअरला पसंती देतात. परंतु बिअर कायम विशिष्ट रंगाच्या बाटलीतच पॅक केली जाते. त्यासाठी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या ( color ) बाटल्याच वापरतात पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, बिअरसाठी या दोन रंगांच्याच बाटलीचा सर्रास वापर का केला जातो? 

जगातील सर्वात जुन्या पेयांमध्ये पाणी हि जीवन आवश्यक गोष्ट असल्यामुळे अर्थातच प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चहा व बिअर हे पेय  तिसऱ्या स्थानावर आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 4,35,270 मिलियन बिअरच्या बाटल्या रिचवल्या जातात. पण जे लोक बिअरच्या बाटल्या रिचवतात, त्यांच्या लक्षात आले असेल की बिअरची बाटली एकतर हिरव्या (green) किंवा तपकिरी (Brown) रंगाची असते. तुम्ही या दोन रंगांव्यतिरिक्त असणाऱ्या बाटलीत बिअर कधी पाहिली आहे का? याचे उत्तर नाहीच असेल. पण बहुतेकांना बिअरच्या बाटल्या या दोन रंगातच का येतात, याचे कारण माहीत नाही.

पहिली बिअर हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये निर्मित करण्यात आली होती, असे मानले जाते. सुरुवातीच्या काळात जेव्हा बिअर तयार केली गेली. तेव्हा ती पारदर्शक काचेच्या बाटलीमध्ये दिली जायची, परंतु काहीच दिवसात त्या बिअरला दुर्गंधी येत, व लोक ती पीत नव्हते. यावर संसोधन केले असता बिअर तयार करणाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, जेव्हा बिअरची बाटली सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, त्यावेळी बिअरमधील आम्ल आणि सूर्याच्या UV किरणांमध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते. मग ही समस्या सोडवण्यासाठी बिअर उत्पादकांनी एक योजना तयार केली. त्यानुसार बिअरसाठी ब्राऊन कोटेड (Brown coated) अर्थात तपकिरी बाटल्या निवडण्यात आल्या. ही युक्ती कामी आली. या रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब होत नव्हती, कारण सूर्याच्या किरणांचा तपकिरी बाटल्यांवर परिणाम होत नव्हता.

मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तपकिरी बाटल्यांचा अचानक तुटवडा निर्माण झाला. या रंगाच्या बाटल्या लवकर उपलब्ध होत नव्हत्या. तेव्हा बिअर बनवणारे दुसरा असा रंग शोधत होते, ज्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव पडणार नाही. त्यावेळी तपकिरी रंगाऐवजी हिरवा रंग निवडण्यात आला. तेव्हापासून बिअर हिरव्या बाटल्यांमध्ये देखील पॅक होऊ लागली. लोक फक्त बिअर आवडीने पितात. पण ही बिअर तपकिरी किंवा हिरव्या रंगाच्या बाटलीत का येते, याचा विचार कदाचित कोणी करीत नाही. मात्र, बिअरची बाटली विशिष्ट रंगाची ठेवण्यामागे बियरवर होणारा  सूर्यकिरणांचा प्रभाव (Effect of sun rays) हे खूप महत्त्वाचे कारण आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने