Bigg Boss Marathi चा चौथा सीझन या तारखेला होणार सुरु.........

ब्युरो टीम: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. 'बिग बॉस मराठी' हा शो घराघरात लोकप्रिय असून सध्या हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत.

      अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून 'बिग बॉस मराठी'चा पुढचा सीझन म्हणजेच 'बिग बॉस मराठी 4' प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार हे समोर आलं आहे. बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. हा सीजन संपल्यापासूनच प्रेक्षकांना चौथ्या सीजनची प्रतीक्षा लागून होती. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमोसुद्धा रिलीज झाला होता.

        आता या शोची तारीखही समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी 4' चा सीझन 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे.

...... 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने