बीजेपीच्या महाराष्ट्रातील(BJP Maharashtra) चार नेत्यांना पक्षात राष्ट्रीय जबाबदारी.

 

विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यांच्या प्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातुन 4 चेहऱ्यांचा समावेश केले असून विनोद तावडे व प्रकाश जावडेकर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 14 राज्यांच्या व नॉर्थ ईस्ट प्रदेश प्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी म्हणुन नियुक्त्ती जाहीर करण्यात आली आहे तर खासदार हरीश द्विवेदी यांची बिहारचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केरळसाठी प्रकाश जावडेकर यांची प्रभारी आणि राधामोहन अग्रवाल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   याशिवाय पंकजा मुंडे मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणुन रमाशंकर कठेरिया यांच्या सोबत काम पाहणार असुन  पी. मुरलीधर राव प्रभारी असणार आहेत. विजया रहाटकर ह्या राजस्थान सहप्रभारीपद सांभाळतील त्यांच्या बरोबर अरुण सिंग हे प्रभारी राहणार आहेत. 

बिप्लब देव यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, ओम माथूर यांना छत्तीसगडचे प्रभारी, तर नितीन नवीन यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय तरुण चुघ हे तेलंगणाचे प्रभारी राहतील तर अरविंद मेनन सह-प्रभारी भूमिकेत दिसणार आहेत. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी म्हणुन खासदार विनोद सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय झारखंडचे लक्ष्मीकांत बाजपेयी यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. 

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, लक्षद्वीपसाठी फक्त खासदार राधामोहन अग्रवाल हेच प्रभारी असतील. पंजाबसाठी प्रभारी म्हणुन  विजय रुपाणी तर नरिंदर सिंग रैना यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजय रुपाणी यांना अतिरिक्त चंदीगडसाठी प्रभारी म्हणुन जबाबदारी दिली आहे, सहप्रभारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. याशिवाय अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी आणि विजय रहाटकर यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार महेश शर्मा यांची त्रिपुराचे प्रभारी म्हणून निवड झाली आहे.

दुसरीकडे, बिहारचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री मंगल पांडे यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून आणि अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संबित पात्रा यांची ईशान्य राज्याच्या निमंत्रकपदी तर ऋतुराज सिन्हा यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने