सचिन तेंडुलकरनंतर आता रोहित शर्माचं नाव



      हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात मॅच विनर हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे आणि रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले.

         रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु मोक्याच्या क्षणी हाँगकाँगच्या १९ वर्षीय गोलंदाज आयुष शुक्लाने विकेट मिळवून दिली. रोहितने १३ चेंडूंत २१ धावांची छोटी खेळी केली असली तरी त्याने आज मोठे विक्रम मोडले.

       रोहित शर्मा) व लोकेश राहुल ही जोडी ओपनिंगला आली. रोहितचा हा आशिया चषक स्पर्धेतील २९वा सामना आहे आणि त्याने आशिया चषक मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा माहेला जयवर्धने ( २८) याचा विक्रम मोडला. रोहितने पहिली धाव घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० धाव करणारा तो जगातला पहिला पुरुष फलंदाज ठरला. महिला क्रिकेटपटूंमध्ये सुझी बॅट्सने हा पराक्रम आधीच केला आहे. रोहितने १३४ सामन्यांत ३२.१२च्या सरासरीने ३५०२+ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ३४९७ धावांसह दुसऱ्या, तर विराट कोहली ३३४३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

         लोकेश - रोहितने तिसऱ्या षटकात हरून अर्षदच्या गोलंदाजीवर २२ धावा कुटल्या. पाचव्या षटकात हाँगकाँगने पहिली विकेट मिळवली. १९ वर्षीय गोलंदाज आयुष शुक्लाच्या फिरकीवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित मिड ऑनवर उभ्या असलेल्या ऐझाजच्या हाती झेल दिला, रोहित १३ चेंडूंत २१ धावा करून माघारी परतला, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशा पराक्रम करणारा तो १५वा ओपनर फलंदाज ठरला.पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने १ बाद ४४ धावा झाल्या होत्या.

    भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहितने चौथे स्थान पटकावले. वीरेंद्र सेहवाग ( १५७५८), सचिन तेंडुलकर ( १५३३५) व सुनील गावस्कर ( १२२५८) हे आघाडीवर आहेत. शिखर धवनच्या १०७२१ धावा आहेत. तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाद जलद १२००० धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावे नोंदवला गेला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने