राष्ट्रीय कार्यकारणीचा शरद पवारांवरच विश्वास ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड.

 


ब्युरो टीम: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विस्तारित कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(Sharad Pawar) यांची पुन्हा एकमताने निवड झाली. शरद पवार यांची निवड एकमताने झाल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

देशापुढे असलेल्या विविध समस्यांवर सदस्यांनी या बैठकीत प्रस्ताव मांडले त्यावरही सविस्तर चर्चा झाली.  याचा सामना करण्यासाठी लवकरच रणनीती ठरवली जाणार असुन, ओबीसी आरक्षण, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक तपास यंत्रणाद्वारे केली दडपशाहीच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे प्रस्ताव देखील मांडण्यात आले आहे.

सरकारच्या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी  येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न विविध पातळीवरून होत आहे. यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आतापर्यंत या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी विरोधकांचे एकत्र येणे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ही खासदारांनी सांगितले.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने