धकधक गर्लने वातावरण केले 'हॉट', मराठमोळ्या माधुरीचा लेहेंगा पाहून चाहते घायाळ

ब्युरो टीम :  बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri dixit) अर्थात धकधक गर्ल तिच्या मादक आदांनी नेहमीच सर्वाना घायाळ करत असते. ही अशा सुंदरींपैकी एक आहे, जी तिच्या वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर होत चालली आहे. 
माधुरीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक लेहेंग्यावर काही फोटो टाकले आहेत, या फोटोनी सोशल मीडियावर एकच आग लावली आहे. ती इतकी अप्रतिम दिसत आहे जे पाहून तुम्हीही भारावून जाल. यावेळी माधुरीने ब्लॅक रंगाची ब्लाऊज घालून त्याखाली राखाडी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केले आहे. 
प्रत्येक ड्रेसची सुंदरता तिच्या ओढणीमध्ये असते. त्याच प्रमाणे या सुंदर ड्रेसवर माधुरीने ट्रान्सपरेंट ओढणी घेतली होती. या ओढणीला खाली सुंदर असे लटकन देखील लावण्यात आले होते. या ओढणीला मोठी चमकी लावण्यात आली होती. या सुंदर लूकसाठी माधुरीने ग्लॉसी मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली होती. तर नॅचरल लूक ठेवत तिने सुंदर व्हेवी हेअर सोडण्यात आले होते. या लूकमध्ये माधुरीने सर्वांच्या मनाचा ठोकाच चुकवला. या सुंदर लूकवर माधुरीने हातामध्ये सुंदर हिऱ्याच्या बांगड्या परिधान केल्या होत्या तर दुसऱ्या हातामध्ये अंगठी परिधान केली होती त्यामुळे तिचा लूक अजूनच सुंदर दिसत होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने